Ad will apear here
Next
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदितांना नोकऱ्यांसंदर्भात मार्गदर्शन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत वेबिनार
पुणे : करोनाच्या साथीमुळे उद्धवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. पदवी घेऊन करिअर सुरू करण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना, नवी नोकरी कशी शोधायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत. विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स विभागा’तर्फे मोफत वेबिनार सीरिजचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी, २१ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी या वेबिनारमधील पहिले सत्र होणार आहे. त्यात पुण्यातील ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’चे अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. ही वेबिनार सीरिज विद्यार्थ्यांना प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाच्या फेसबुक पेजवर पाहता येईल. (फेसबुक पेजची लिंक : https://www.facebook.com/SPPUPCRC/)

‘या वेबिनार सीरिजमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांच्यामध्ये एक वास्तववादी दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल,’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाचे संचालक आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

ही वेबिनार सीरिज विद्यार्थ्यांसाठी मोफत असून, विद्यार्थी पुढील लिंकवर त्यांची नोंदणी करू शकतात. 
नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/6oNPFguw9mRkz5wx6


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZQVCM
Similar Posts
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी पुणे : ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान घेणे खूप गरजेचे आहे. अभियंत्यांसाठी विविध पदांकरिता सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु माहितीअभावी अभियंते या क्षेत्राकडे वळत नाहीत. केवळ खासगी नोकऱ्या करण्यापेक्षा प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत
करोनानंतरच्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थिकेंद्री बनेल : डॉ. अभय जेरे पुणे : ‘करोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थिकेंद्री होईल. प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्रकुशल विद्यार्थी देशाला हवे असून, त्याकडे लक्ष द्यावे लागेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले
‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ शिष्यवृत्तीकरिता नोंदणी सुरू मुंबई : भारतीय संरक्षण दलांच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सेंचुरियन डिफेन्स अकादमी या सेंचुरियन एज्युकेशन प्रा. लि.च्या संरक्षण विभागाने वर्ष २०२०साठी ‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ची (एसआरएनटीएच) नोंदणी सुरू केली आहे. संरक्षण दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language